येवला शहरासह परिसरात श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर महामृत्युंजय मंदिर इथं शिवभक्तांनी अनोख्या पद्धतीने श्रीराम जन्मोत्सव साजरा करून भक्तीचा अद्वितीय संगम घडवून आणला आहे. मंदिर परिसरात नंदीभोवती आकर्षक आणि भव्य अशी श्रीरामांची रांगोळी साकारली आहे.