शिर्डी साईबाबांची महती देशभर पोहोचवण्यासाठी शिर्डी संस्थानने काढलेली साई पादुका दर्शन यात्रा सध्या उत्तर भारतात भक्तीचा महापूर निर्माण करत आहे. 1 ते 14 डिसेंबर दरम्यान सुरू असलेल्या या यात्रेला दिल्ली, नोएडा आणि चंदीगडमध्ये ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला. भजन, कीर्तन, ढोल-ताशा आणि फुलांच्या वर्षावात साई पादुकांचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. 7 डिसेंबर जालंधर, 8 कुरुक्षेत्र, 9 व 10 आग्रा, 11 व 12 लखनऊ आणि 13 डिसेंबरला बाराबंकी येथे साई पादुकांचे दर्शन होणार असून, हजारो भक्त उपस्थित राहण्याची शक्यता आहे.