अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील विष्णोराच्या पाण्याच्या टाकीतून भला मोठा नाग निघाला. बनावट सर्पमित्राचा खेळ पाहून नागरिक हादरले. कथित सर्पमित्रांना फोन करून बोलावले. परंतु आलेला सर्पमित्र कोणतेही सुरक्षा साधन न बाळगता ना हात हुक, ना बॅग, ना बूट - थेट हाताने साप पकडू लागला. इतकेच नाही तर नागाला पकडल्यानंतर त्याचा खेळ करून दाखवला.