महामार्गाकडून स्टेशन कडे जाणाऱ्या वाहिनीवर वाहतूक कोंडी झाले आहे. साईनाथ नगर ते विरार स्टेशनपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमानांचे हाल झाले. वाहतूक पोलीस नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाले आहे. दररोज सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे सकाळी लवकर वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.