पुणे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून आता हे बिबटे प्राण्यांसह मानवावर हल्ले करत आहेत, या हल्ल्यापासून संरक्षण व्हावे या साठी शेतकऱ्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. कुत्र्यांवर वन्य प्राण्यांनी हल्ला करू नये यासाठी शेतकरी कुत्र्याच्या गळ्यात लोखंडी खिळ्यांचे पटृटे घालतात, पण आता हेच पट्टे शिरूर परिसरातील पिंपरखेड येथील शेतकऱ्यांनी आपल्या गळ्यात घातले आहेत.