सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील हुमगाव येथे महिलांनी एकत्र येत अवैध दारू अड्डा उद्ध्वस्त केला. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या धंद्यामुळे गावात वाद, कौटुंबिक तणाव आणि तरुणांचे आयुष्य बरबाद होत होते. यापूर्वी मतदानाने दुकाने बंद केली, पण अवैध अड्डे वाढले. आता महिलांनी थेट कारवाई करत दारूच्या बाटल्या पेटवून पुन्हा असा धंदा न सुरू करण्याचा इशारा दिला.