विदर्भातील पांढरे सोन म्हणून ओळख असलेल्या कपाशी पिक पावसा अभावी धोक्यात आले असुन देऊळगाव राजा,सिंदखेड राजा तालुक्यातील शेकडो हेक्टर वरील कपाशी पिक वाळले आहे. परिणामी कपाशी उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे. या दोन्ही तालुक्यात यावर्षी पाऊस कमी झाल्याने सोयाबीन पिक तर गेले, मात्र कपाशी पिक सुद्धा पावसा अभावी वाळून गेले. देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पात सुद्धा यावर्षी केवळ दोन टक्के पाणीसाठी उपलब्ध असल्याने पाटला सुद्धा पाणी येऊ शकत नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी खडकपूर्णा प्रकल्पाचे भरवशावग कपाशी लागवड केली होती आणि लागवडीसाठी जो खर्च केला होता, तो सुद्धा निघणार नाही. सोयाबीन तर गेलेच मात्र आता कपाशी सुद्धा गेल्याने शेतकऱ्यावर मोठ संकट कोसळले असून दुष्काळाची दाहकता तीव्र होताना दिसत आहे.