ग्रामीण भागात कडाक्याच्या थंडीमध्ये हुरडा पार्टीच्या शेकोट्यानी वातावरण चांगलंच हॉट केलंय. गावात ठिकठिकाणी हुरडा पार्टीचा आयोजन केले जातय. लबुंद भट्टीमध्ये भाजलेला हुरडा त्याचे बरोबर थंडगार उसाचा रस, मठ्ठा, शेंगदाणे, गुळ, शिजवलेले मक्याचे कणीस आणि चटणी या गावरान मेव्यावर ग्रामीण भागात ताव मारला जातोय.