माजी खासदार हुसेन दलवाईंनी लोटे MIDC मधील PFAS उत्पादनाला कोकणच्या पर्यावरणासाठी अत्यंत घातक म्हटले आहे. यामुळे पाणी, जमीन आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर, दीर्घकालीन दुष्परिणाम होतील. लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीवर तात्काळ टाळे ठोकावे आणि PFAS उत्पादनाबाबत स्वतंत्र व पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देत सरकारने कठोर निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी दिला.