पालघर नगरपरिषदमधील शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उत्तम घरत यांनी आंबा माता मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. 25 वर्षांच्या कामावर माझाच विजय होऊन नगराध्यक्ष म्हणून माझ्या गळ्यात माळ पडेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. माझाच विजय व्हावा असं साकडंही उत्तम घरत यांनी आंबा माताकडे घातलं आहे.