मला डॉक्टर व्हायचं होतं परंतु मार्क कमी मिळाले म्हणून मी ऍडमिशन घेतले नाही.आमच्या प्रीतम ताईंना वकील व्हायचं होतं परंतु त्या डॉक्टर झाल्या आणि येसू ताई वकील झाल्या.धनु भाऊ मात्र भाग्यवान आहेत त्यांना राजकारणी व्हायचं होतं आणि ते राजकारणातच आले,असंच होतं ज्याला जे व्हायचं असतं ते होता येत नाही, असं म्हणत मंत्री पंकजा मुंडे यांनी परळी येथे एका कार्यक्रमात आपली खंत बोलून दाखवली.