इचलकरंजी : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा भगव्या रंगाच्या कापडाने केलेली सजावट नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. या आकर्षक सजावटीमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली असून ही सजावट पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.