इचलकरंजी महानगरपालिकेची आज झालेली सर्वसाधारण सभा अनोख्या आंदोलनामुळे चर्चेचा विषय ठरली. शहरातील विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक संजय तेलनाडे आणि नगरसेविका स्मिता तेलनाडे यांनी थेट बैलगाडीतून महापालिकेत प्रवेश करत आंदोलनात्मक पद्धतीने आपला निषेध नोंदवला. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या प्रवेशामुळे महापालिका परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.