इचलकरंजी शहरात आज झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. अवघ्या काही तासांच्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले असून नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे आणि नाल्यांचे पाणी शिरल्याने मोठी तारांबळ उडाली. पाटील मळा, चांदणी चौक, अयोध्याकाली, विक्रमनगर, सांगली रोड परिसरासह अनेक भागांतील घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांना मोठा फटका बसला आहे.