इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयातील सिटी स्कॅन आणि एक्स-रे सेवा शासनाकडून बिल थकल्याने बेमुदत बंद करण्यात आल्या आहेत. दहा महिन्यांपासून कोट्यवधी रुपयांची थकबाकी न मिळाल्याने ठेकेदार संस्थेने हे पाऊल उचलले.