आपत्ती व्यवस्थापनात सर्व समाजघटकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने इचलकरंजी महानगरपालिकेने एक अभिनव आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. शहरात प्रथमच महापालिकेच्या वतीने त्रितीयपंथीयांची ‘रेस्क्यू फोर्स’ स्थापन करण्यात आली असून, या पथकात सहा त्रितीयपंथीयांचा समावेश करण्यात आला आहे. या पथकाला पंचगंगा नदीकाठी प्रत्यक्ष पूरबचाव आणि आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले.