यवतमाळ जिल्ह्यात गोकुळाष्टमी निमित्त घरोघरी श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना करण्यात आली.'हाती घोडा पालखी, जय कन्हैया लाल की' असा गजर आणि शंखनाद करीत रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या आनंदात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी गोकुळ अवतरले असे दृश्य ठिकठिकाणी दिसून आले.अनेक कुटुंबात श्रीकृष्ण जन्मोत्सवाची शेकडो वर्षांची परंपरा असून सुंदर देखावे आकर्षण ठरतात. श्रीकृष्ण मूर्ती स्थापनेनंतर रात्रभर भजनाचे कार्यक्रम होऊन आज महाप्रसाद आणि उद्या विसर्जनानंतर गोपाळ काल्याचे आयोजन होते.