इगतपुरी शहरातील ग्रामदैवत व जागृत देवस्थान असलेल्या गिरजा मातेच्या यात्रा उत्सव निमित्ताने मातेच्या प्रतिमेची, मुखवट्याची रथावरून शोभा यात्रा काढण्यात आली. या यात्रेत महिलांनी डोक्यावर मंगल कलश हातात भगवा ध्वज घेत सहभाग नोंदविला. यात्रेसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून हजारो लोक दर्शनासाठी दाखल होत असून हवन, नामजप व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.