मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावर मंगला एक्स्प्रेसमध्ये साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. हा 4 फूट लांबीचा हरिण टोल जातीचा हिरव्या रंगाचा विषारी साप S 7 बोगीच्या कपलिंगमध्ये आढळला.ट्रेनमध्ये साप असल्याचे समजताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. हा साप झाडावर राहणारा असून कदाचित गाडी पास होताना तो गाडीवर पडला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, कसारा स्थानकात गाडी आल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी या सापाचे रेस्क्यू ऑपरेशन करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.