इगतपुरी तालुक्यातील तळोघ गावात बिबट्याचा मुक्त संचार सुरु असल्याची घटना घडली आहे.सायंकाळच्या वेळेस बिबट्या कुत्र्याची शिकार करण्यासाठी गावात आला होता. मात्र नागरिकांनी त्याला पाहून आरडा ओरडा केला असता बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नागरिकांनी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.