इगतपुरी तालुक्यातील मांजरगाव येथील घरांच्या खाली असलेली माती वाहून गेली. यामुळे घरांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. येथील दहा ते बारा कुटुंब चिंतेत आहेत. सध्या 50 जणांना गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हलविण्यात आले आहे.