इगतपुरी तालुक्यातील मुख्य धरणाच्या पाणीसाठ्यात घट झाली असून अनेक धरणात 50 टक्क्यांपेक्षा कमी पाणी साठा आहे. अनेक धरणं तळ गाठण्याच्या मार्गावर आहेत .प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सद्य स्थितीत इगतपुरी तालुक्यातील वाकी धरणात 8%, भाम् धरणात 5% ,भावली धरणात 24% ,दारणा धरणात 16%, मुकणे धरणात 29% वालदेवी धरणात 57%, टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.