छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी भागात घरगुती वापराचा एलपीजी वाहून नेणाऱ्या महाकाय टँकरमधून अवैधरीत्या व्यवसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. वाळूज औद्योगिक परिसराला लागून असलेल्या गंगापूर परिसरात हा प्रकार सुरू होता.