परभणी जिल्ह्यात अवैध वाळू उपसा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. परभणीच्या मानवत–सेलू तालुक्यातील सांवगी मगर परिसरात दुधना नदीपात्रातून गेल्या 12 दिवसांपासून सर्रास अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, स्थानिक नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.