आषाढी एकादशीनिमित्त सोलापुरातील करमाळा तालुक्यातील केम इथं संध्याकाळी संत बाळूमामाच्या पालखी क्रमांक 1 चं आगमन झालं. या निमित्ताने आयोजित दर्शन सोहळ्याला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून बाळूमामांच्या दर्शनासाठी परिसरातील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती.