खानदेशातील पारंपरिक आणि श्रद्धेचा सण असलेल्या कानबाई मातेच्या उत्सवाची धुळ्यातील शिरपूर तालुक्यात मोठ्या उत्साहात सांगता झाली. दीड दिवसांच्या या उत्सवासाठी गावातील नागरिक आणि माहेरवाशीण एकत्र आले होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीत महिला आणि पुरुषांनी फुगड्या खेळत आणि नृत्य करत उत्साहात सहभाग घेतला.