साताऱ्यात नगरपालिकेने बुधवार नाका परिसरात तयार केलेल्या कृत्रिम तलावामध्ये घरगुती गणेश विसर्जनाला सुरुवात झाली होती. शुक्रवार सकाळपासून सातारा शहरातील पाच कृत्रिम तलावामध्ये घरगुती गणपतीचे विसर्जन सुरू झाले होते. दुपारनंतर गणेश मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. कृत्रिम तलाव परिसरात मोठे गणपती विसर्जन करण्यासाठी भली मोठी क्रेन उभारण्यात आली आहे.