नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच गणेश मंडळांच्या वतीने आपल्या लाडक्या बापाचे विसर्जन मिरवणूक संपल्या आहेत. नंदुरबार शहरातील प्रथम आणि द्वितीय मानाचे दादा आणि बाबा गणपतीची हरिहर भेट झाली हरिहर भेटीनंतर जिल्ह्यातील सर्वच गणेश विसर्जन होत असतं, या हरिहर भेट पाहण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यासह शेजारील असलेल्या गुजराती, मध्य प्रदेश राज्यातून गणेश भक्त मोठे संख्येने येत असतात. विसर्जनानंतर दोन्ही मानाच्या गणरायांची आरती होत असतें