नाशिक जिल्ह्यात यावर्षी गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून सुरुवातीला पीकस्थिती समाधानकारक दिसत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलांमुळे गव्हाच्या पिकावर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना औषध फवारणी करण्याची वेळ आली असून उत्पादन खर्चात पुन्हा वाढ होत आहे.