आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका आता नाशिकच्या येवल्यातील पोल्ट्री उद्योगाला बसू लागला आहे. अंड्यांची निर्यात ठप्प झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात अंड्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यामुळे अंड्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे.