आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता शेती क्षेत्रावर उमटताना दिसत आहेत. खतांच्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, रासायनिक खतांचीही दरवाढीची होण्याची शक्यता दिसू लागली आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतांचा वाढलेला खर्च परवडणारा नसल्याने अनेक शेतकरी पर्यायी मार्गांचा विचार करत आहेत. रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेतीचा खर्च वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आता शेणखत, गांडूळखत यांसारख्या सेंद्रिय खतांकडे वळताना दिसत आहेत. कमी खर्चात शेती टिकवून ठेवण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता कायम राखण्यासाठी सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले जात आहे.