छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या वाहनावर नाराज कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. निवडणूक प्रचारादरम्यान हा प्रकार घडला असून, पोलिसांना कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. या घटनेनंतर इम्तियाज जलील यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. यापूर्वीही त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते.