धुळे जिल्ह्यामध्ये दोन लाख 80 हजार हेक्टरच्या पुढे रब्बी हंगामाची पेरणी झाली असून यात गहू हरभरा मक्याचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण जिल्ह्याच्या परिसरात असून त्यामुळे ही रब्बी पिक धोक्यात आलेली आहेत. मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला असून हवामानात बदल झाल्याने गहू आणि हरभऱ्याची वाढ खुंट झाली आहे. हवामान बदलाचा फटका उत्पादनावर होणार आहे, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.