गडचिरोलीपासून अमीर्झा जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग जवळ जंगलात रानटी हत्तींचा कळप दिसल्याने लोकांनी त्यांचे सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला आहे. 32 रानटी हत्तींचा कळप जवळपास तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात आहे. या रानटी हत्तींचे काही दुचाकीवरील प्रवाशांनी मोबाईलवर व्हिडिओ शूट करणे सुरू केले. पण अचानक रानटी हत्तीने राष्ट्रीय महामार्गावर येऊन नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तीन पुरुष आणि एका महिलेने धाव घेत आपला जीव वाचविला. दुचाकी चालकांनी येथून पलायन केले.