येत्या १ मे पासून रिक्षा परवान्यासाठी मराठी भाषा येणं बंधनकारक करण्यात आल्याने, परप्रांतीय रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहेत. या सक्तीमुळे मुंबई, नालासोपारा आणि उपनगरांमधील अनेक परप्रांतीय रिक्षाचालक आता आपल्या मूळ राज्याकडे, म्हणजेच उत्तर प्रदेश आणि बिहारकडे परतू लागले आहेत.