जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील परसाळे येथे वादळी वाऱ्यामुळे लग्न-हळद समारंभाचा मंडप उडाल्याचा प्रकार घडला आहे. उडणाऱ्या मंडपाला तरुणांनी सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र वादळाचा वेग अधिक असल्याने तरुणांचा हा प्रयत्न फसला. मंडपाला सावरण्याचा प्रयत्न करत असताना अनेक तरुण खांबाला लटकले. सुदैवाने घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, वादळी वाऱ्यामुळे मंडपाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे