येवला शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या विंचूर चौफुली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या तृप्ती फरसाण या दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास टवळखोरांनी पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. दरम्यान येवल्यातील अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे सुदैवाने पुढील अनर्थ टळला आहे. सीसीटीव्ही दिसणाऱ्या टवाळखोरांचा शोध घेऊन पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.