बुलढाणा शहरातील तेलगू नगर परिसरात आज सकाळी काँग्रेस नगरसेवकाच्या प्रचार बॅनरवर अज्ञात व्यक्तींनी शाही फेकल्याची घटना उघडकीस आली. निवडणुकीच्या आदल्या दिवशी झालेल्या या प्रकारामुळे परिसरात अचानक तणावाचे वातावरण निर्माण झाले.