नागपूरातील बहुतांश व्यस्त ट्राफिक सिग्नलवर भिकाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. भिकारी अगदी लहान-लहान बाळांना रणरणत्या उन्हात भीक मागण्याच्या कामाला लावतात, अशा ३० पेक्षा अधिक भिकाऱ्यांना त्याच्या गावी सोडून देण्याची मोहीम नागपूर पोलिसांनी सुरू केली असून त्याला मिशन मुक्ती असे नाव देण्यात आले आहे.