गोंदिया जिल्ह्यात हुडहुडी भरवणारी थंडी जाणवत आहे. त्यामुळे मानवाप्रमाणे जनावरांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम जाणवत आहे. त्यामुळे जनावरांना विविध आजार बळावण्याची शक्यता आहे. अशावेळी पशुपालकांनी जनावरांची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाने केले आहे.