शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला परिसरात बिबट्याच्या हालचालींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या आठवडाभरात तिसऱ्यांदा बिबट्या लोकवस्तीच्या शेजारी दिसून आल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.