परभणी तालुक्यातील सावंगी खुर्द परिसरात रोही प्राण्यांचा उच्छाद वाढल्याने शेतकऱ्यांचे गहू–हरभऱ्यासह विविध पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यापूर्वी हरीण व रानडुकरांचा त्रास असतानाच आता रोहींच्या वाढत्या धाडीमुळे शेतकरी संतप्त आहेत.