वाशिम जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फटका आता पशुधनालाही बसताना दिसत आहे. कडक उन्हामुळे गुरं-वासरांना हिरवा चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई भासत असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यातील अनेक नदी-नाले आटत आल्या असून जंगलातील झाडं-पानंही वाळून गेल्याने जनावरांसमोर उपासमारीचं संकट उभं ठाकलं आहे.