इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस विभागाची लिफ्ट महिनाभरापासून बंद आहे. यामुळे वृद्ध आणि अशक्त डायलिसिस रुग्णांना पायऱ्यांवरून ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्ण आणि नातेवाईकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने लिफ्ट दुरुस्त करून रुग्णांचे हाल थांबवावे अशी मागणी केली जात आहे.