परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्तकी यांच्यात नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत भारताने अफगाणिस्तानला 20 रुग्णवाहिका भेट दिल्या. तसेच, काबुलमध्ये दूतावास उघडण्याची आणि अफगाणिस्तानातील विकास व मानवतावादी मदत कार्य सुरू ठेवण्याची घोषणा भारताने केली.