सलग तिसऱ्या महिन्यात जेट इंधनाच्या दरात वाढ झाल्याने विमान प्रवास महाग होण्याची शक्यता आहे. दिल्ली आणि चेन्नईमध्ये प्रति किलोलिटर ९ हजार रुपयांनी वाढ झाली असून, आता इंधनाचे दर १ लाख रुपयांच्या पुढे गेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असतानाही ही दरवाढ झाली आहे, त्यामुळे विमान कंपन्या लवकरच तिकिटांचे दर वाढवू शकतात.