भारताने फ्रान्सकडून 114 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा संरक्षण सामग्री खरेदी व्यवहार असून, याची एकूण किंमत 3 लाख 60 कोटी रुपये इतकी आहे. यामुळे भारताची संरक्षण क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे.