भारत ९० राफेल F4 आणि २४ राफेल F5 लढाऊ विमाने खरेदी करण्यावर फ्रान्सशी चर्चा करत आहे. जर हा करार झाला, तर भारत राफेल F5 चा पहिला वापरकर्ता बनेल. हे F5 व्हर्जन शक्तिशाली इंजिन, अत्याधुनिक सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम आणि स्टेल्थ ड्रोनसह हवाई युद्धात क्रांती घडवेल, असे डसॉल्ट एव्हिएशनने स्पष्ट केले आहे.