जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी मोहिमेत आर्मी डॉग टायसनने अभूतपूर्व शौर्य दाखवले. शत्रूची गोळी लागूनही या जर्मन शेफर्डने माघार घेतली नाही, ज्यामुळे तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. जखमी अवस्थेतही टायसनने आपले कर्तव्य बजावले, आता तो उपचाराधीन असून त्याची प्रकृती सुधारत आहे.