केंद्र सरकारने अँटिबायोटिक औषधांच्या ओळखीसाठी पॅकेजिंगवर खास कोडिंग, रंगीत पट्ट्या किंवा चिन्हे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रुग्ण आणि फार्मासिस्ट यांना औषधाची श्रेणी लगेच समजेल. अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) चा धोका आणि औषधांचा गैरवापर टाळण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.